Type Here to Get Search Results !

र.भा.माडखोलकर महाविद्यालयामध्ये भव्य रोजगार मेळावा.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यासाठी गोवा, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर,धारवाड, हैदराबाद येथील नामांकित इंडस्ट्रियल एरिया मध्ये असलेल्या कंपन्या येणार आहेत. 


या कंपन्यांमध्ये विविध पदासाठी भरती केली जाणार आहे.पुरुष व महिला उमेदवारासाठी असणाऱ्या या मेळाव्यामध्ये बीए, बी कॉम, एम कॉम, बीएस्सी, एमएसी,  बीसीए, डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी हजर रहावे.यापूर्वीही महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यामध्ये झालेली आहे.यातून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला आहे.त्यामुळे इच्छुक व पात्र युवक व युवतीनी  या रोजगार मेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे.त्याचबरोबर  942110 3766 व  942111 2966 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.डी.गोरल व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.आर. एन साळुंके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments