चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : संयुक्त कलाकार एकता वेल्फेअर फाउंडेशन संचलित अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाच्या चंदगड तालुकाध्यक्षपदी विजयकुमार कांबळे (आमरोळी )यांची निवड करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष जयवंतराव वायदंडे उपाध्यक्ष अनिता पाटील, परशुराम कुंभार, सचिव महेश कदम,खजिनदार सुनील पाटील, सचिन लोहार महिला प्रतिनिधी अरुणा जाधव यांच्या उपस्थितीत नुकतेच गडहिंग्लज येथे बालाजी हॉल येथे कलाकार बैठकीत निवडीचे पत्र देवून गौरविण्यात आले.विजयकुमार कांबळे हे बरेच वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत असून सध्या ते चंदगड डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष आहेत.
यावेळी तालुका उपाध्यक्ष रामलिंग नाईक (तुडये),संपर्कप्रमुख अर्जुन नाईक (वरगाव)सदस्य उत्तम गोविंद पाटील (पोरेवाडी), जिल्हा उपाध्यक्षपदी विजय आनंद गावडे(वैताकवाडी)सदस्य मधुकर कांबळे ( गवसे ) यांची निवड करण्यात आली.या निवडीनंतर बोलताना अध्यक्ष विजयकुमार कांबळे म्हणाले की कलाकाराची जात पात असा भेदभाव न करता तो खरोखरच कलाकार आहे काय ? हे तपासावे.व त्या कलाकाराना योग्य तो न्याय द्यावा.ज्यांचे वय आणि कला याचीही दखल घेऊन त्यांना योग्य त्या सुविधा देण्याचे काम केले जाईल अशी ग्वाही विजयकुमार कांबळे यांनी बोलताना दिली.
Post a Comment
0 Comments