(२ लाखांच्या मद्यासह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त,स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई)
चंदगड/प्रतिनिधी : गोवा बनावटीच्या मद्याची तस्कर करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३४ हजार रुपयांचे मद्य, ५ लाख रुपयांचे वाहन असा सुमारे ७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लक्ष्मण सातेरी पाटील (वय ५४ रा. बहादुरवाडी पोस्ट ता. किणये जि. बेळगांव) असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या मद्याची चंदगड मार्गे कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती. यानुसार मोटणवाडी फाटा ते पाटणे फाटा जंगमहट्टी या मार्गावर सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरित्या जाताना आढळून आली. स्थानिक यावेळी गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कार थांबवली असता, त्यांना वाहनामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आढळून आले. २ लाख ३४ हजार रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य आणि ५ लाख रुपयांचे वाहन असा सुमारे ७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, दिपक घोरपडे, सतिश जंगम, समीर कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.
Post a Comment
0 Comments