पुणे/प्रतिनिधी : पुण्यामध्ये भाजपाचे स्थानिक नगरसेवक हरिदास भाऊ चरवड व नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका, पुणे यांच्या संयोगाने मोठ्या उत्साहात योगदिन साजरा करण्यात आला.
या योगाचे आयोजन संस्थेच्या चेअरमन वंदना संतोष गावडे व संचालक संतोष विठोबा गावडे यांनी विशेष प्रयत्न करून हा जागतिक योग दिवस उत्साहात साजरा केला.व पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येईल असा संकल्प त्यांनी केला.यामध्ये विशेष सहकार्य नागरिक रहिवाशी संघाचे अध्यक्ष मारुती शिटीयाळकर व सर्व कार्यकारणी यांचे लाभले. यावेळी नगरसेवक हरिदास भाऊ चरवड व खडकवासला युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री.उभे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments