Type Here to Get Search Results !

र.भा.माडखोलकर महाविद्यालयात कॉ.आनंद मेणसे यांचे व्याख्यान.

चंदगड/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता बाळ स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत  गुरुवार दि. 26 जून 2025 रोजी राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कॉ.आनंद मेणसे (बेळगाव ) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.


आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, त्याच अनुषंगाने यावर्षी बेळगाव येथील प्रसिद्ध विचारवंत कॉ. आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे,अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक  ॲड. एन.एस.पाटील असणार आहेत तरी तालुक्यातील सर्व पुरोगामी,शाहूप्रेमी कार्यकर्त्यांनी, व सुजान नागरिकांनी  या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन  प्र. प्राचार्य डॉ. एस.डी.गोरल व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. डी कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments