Type Here to Get Search Results !

माडखोलकर महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र. भा. माडखोलकर  महाविद्यालयात जागतिक ज्ञान- साधना योग दिन उत्साहात पार पडला.महाविद्यालयाच्या एस एन पाटील सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागप्रमुख योगगुरु डॉ. पी.एल भादवणकर,व हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. एन.पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व विशद करून प्रात्यक्षिके सादर केली. 


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगामुळे तंदुरुस्त होण्याबरोबर  स्मरणशक्ती वाढते यासाठी नियमित योगा करण्याचे आवाहन यावेळी डॉ.भादवणकर व डॉ.पाटील यांनी केले.महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.एस डी. गोरल यांनी सर्वांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. आभार प्रा.ए. डी. कांबळे यांनी मानले. या योग दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments