Type Here to Get Search Results !

अडकूर येथे केंद्रीय प्राथमिक शाळेकडून विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत.

चंदगड/प्रतिनिधी : केंद्रीय प्राथमिक शाळा अडकूर येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या शुभहस्ते इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या तब्बल 29  विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.प्रास्ताविक व स्वागत अर्चना देसाई यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी शाळेने दोन वर्षांमध्ये विविध उपक्रमांद्वारे व स्पर्धा परीक्षेतील यशाच्या माध्यमातून शाळेने एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप भेकणे यांनी आपल्या मनोगतात सर्व शिक्षकांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.प्रमुख पाहुणे तहसीलदार चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले.आम्ही अधिकारी होण्यामागे पुण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी मनोगतात नमूद केले.सर्व विद्यार्थी व शिक्षकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आभार केंद्रप्रमुख डी.एस पाटील यांनी मानले.तहसीलदार चव्हाण यांच्याहस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शरद देसाई,मोहन आवडण,राजकुमार करडी,अर्चना देसाई,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप भेकणे,सदस्य लक्ष्मण चौगुले,प्रियंका संकपाळ,सोनाली कांबळे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments