Type Here to Get Search Results !

बुरुडे येथील नवविवाहित दापत्यांचा संशयास्पद मृत्यू.

आजरा प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : मूळचे शिवाजीनगर व सध्या रा.बुरुडे तालुका आजरा येथील सागर सुरेश करमळकर (वय -32 ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर( वय 27) या दाम्पत्यांचा गुदमरून मृत्यू झाला.सागर व त्यांच्या पत्नी सुषमा करमळकर हे आंबोली येथे गेले होते.त्यांनतर संध्याकाळी घरी परतले.पण त्यांनतर त्या दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद दाखवत होता. 


त्यानंतर त्यांच्या मित्राने तातडीने घर गाठून हाक मारली असता आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने त्याने सागर यांच्या कुटुंब व मित्र परिवारांना कळविले.यावेळी सर्वांनी आत प्रवेश करून पाहिले असता हे दाम्पत्य बाथरूम मध्ये त्यांना मृतावस्तेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. बाथरूम मधील गॅस गिझर मधील गॅस गळती होऊन गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण काय ते स्पष्ट होईल? असे सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments