नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : कोळींद्रे ता.आजरा येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी मनीषा विजय अमृस्कर यांची निवड मंडळ निरीक्षक संदीप कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.नूतन उपसरपंच मनीषा विजय अमृस्कर यांचा सत्कार सरपंच वंदना सावंत यांच्याहस्ते पार पडला.या बैठकीमध्ये स्वागत ग्रामसेवक किशोर पाटील यांनी केले.प्रास्ताविक सुभाष सावंत यांनी केले,तर आभार सुरेश सावंत यांनी मानले.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नूतन उपसरपंच मनीषा विजय अमृस्कर म्हणाल्या की,सरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांना विश्वासात घेवून येणाऱ्या काळात गावचा विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.यावेळी सदस्य दिपाली पाटील,माजी उपसरपंच व सदस्य मनोहर पाटील,सदस्य सदाशिव हेब्बाळकर,नंदाताई जाधव यांचेसह उद्योजक सामाजिक कार्यकर्ते व तं.समिती सदस्य विजय अमृस्कर व त्यांचे बंधू संतोष अमृस्कर, समाजसेवक नरसू शिंदे,प्रकाश पाटील,कृष्णा परसु नाईक,दिनकर देसाई,नागोजी पाटील,सचिन देसाई,संभाजी नारळकर,सुरेंद्र पाटील व मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments