नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : अडकुर ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला व माजी उपसरपंच गणेश लहू दळवी यांच्या मातोश्री श्रीमती सुहासिनी लहू दळवी वय 75 वर्षे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी सायं.7 वा.26 मिनिटांनी निधन झाले.
त्यांचा अल्प परिचय थोडक्यात. स्व. श्रीमती सुहासिनी दळवी यांचा स्वभाव साधा,मनमिळावू व प्रेमळ असा होता.त्यांना शेतीची व जनावरे पाळणेची आवड होती. लहानापासन थोरांपर्यंत सर्वांना त्या आदराने वागवत असत.त्या उत्कृष्ट गृहिणी होत्या.त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.त्यांचे दिवस कार्य गुरुवार दि.01 जुलै 2025 रोजी होणार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
ऋण निर्देश -
आमच्या मातोश्री स्व.श्रीमती सुहासिनी लहू दळवी वय 75 वर्षे यांचे शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी सायं.7 वा.26 मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार, शैक्षनिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर ,सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य , यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा समस्त दळवी परिवार ऋणी आहे.
शोकाकुल परिवार -
मुलगा - गणेश दळवी,माजी उपसरपंच
सून - सौ.लता गणेश दळवी
नातवंडे - विशाल,विवेक
व समस्त दळवी परिवार, अडकुर ता.चंदगड.
Post a Comment
0 Comments