Type Here to Get Search Results !

बीसीए,बीबीए सीईटी परीक्षेत संजना रजपूत व अमन मदारने मारली बाजी.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथे सुरू असलेल्या साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बीएससी कॉलेजच्या महाविद्यालयात बीसीए, बीबीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये कु.संजना संजय रजपूत हिने 96.13 टक्के तर अमन मदार याने 75.96 टक्के गुण मिळविले.ही परिक्षा सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून बीसीए व बीबीए या अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य आहे.

    

या परिक्षेसाठी साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ बीसीए या महाविद्यालयाने कार्यशाळा घेतली होती.विद्यार्थी,विद्यार्थीनीं या कार्यशाळेला सकारात्मक प्रतिसाद पहायला मिळाला.या विद्यार्थ्यांना प्राचार्य संतोष चौगुले,प्रा.कावेरी लोहार,प्रा.मयुरी सुतार,प्रा.पुडलिक गावडे, प्रा.मोहन अमृस्कर, प्रा. निदा दरवाजवर, इत्यादीचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments