चंदगड/प्रतिनिधी : मा.आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमानीं साजरा करण्यात आला.त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडून काही ठिकाणी गरजू लोकांना साहित्य, मुलांना शैक्षणिक वाटप करण्यात आले.राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत मंजूर एकूण 200 संसार उपयोगी भांडी संचांचे वितरण चंदगड तालुक्यातील गरजू बांधकाम कामगार व लाभार्थ्यांना करण्यात आले.सदर संसार उपयोगी भांडीसंच मा.आमदार राजेश पाटील यांचे सुपुत्र निखिलदादा पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
हा भांड्यांचा संच गोरगरीब कुटुंबांच्या दैनंदिन गरजांसाठी अत्यंत उपयुक्त असून, सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.या सहकार्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. या उपक्रमामुळे सामान्य जनतेमध्ये आ. राजेश पाटील यांच्याबद्दल असलेली आपुलकी वाढली आहे.यावेळी कार्यक्रमाला युवा नेते निखिल पाटील,बाजार समिती मा.अध्यक्ष अभयदादा देसाई,संघाचे जनरल मॅनेजर एस.वाय.पाटील,राहुल देसाई यांनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे निवेदन एस.एन.पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमास आपाजी करडे,भीमराव चिमणे,विश्वनाथ ढेकोळकर,मोहन कुंदेकर,आमदार युवा मंच कार्य,राष्ट्रवादी कार्यकर्ते,भागातील महिला व मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते
Post a Comment
0 Comments