Type Here to Get Search Results !

प्रा.राजकुमार तेलगोटे यांना पीएचडी पदवी प्राप्त.

 

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. राजकुमार कर्मवीर तेलगोटे यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची विद्यावाचस्पती तथा पीएचडी पदवी प्राप्त झाली.


प्रा.आर.के.तेलगोटे यांनी ' पोस्टकलोनिअल मॅनिफेस्टेशन्स: ऍन ओव्हरव्हू इन सिलेक्ट इंडियन काॅन्टेक्स्ट्स' या विषयावर आपला प्रबंध नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला सादर केला होता. प्रा. तेलगोटे हे गेली वीस वर्षाहून अधिक काळ र.भा. माडखोलकर महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करतात.त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत.एक जिज्ञासू व इंग्रजीचे निष्णात प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्रो. डाॅ. रमेश ढगे यांचे मार्गदर्शन लाभले.खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सर्व संचालक,प्र.प्राचार्य डॉ. एस.डी गोरल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments