कोल्हापूर/प्रतिनिधी : ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाचे शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात उध्दव ठाकरेंना धक्क्यांवर धक्का बसला आहे.आज पत्रकार परिषद घेवून संजय पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे.
गेली 36 वर्ष मातोश्रीसी एकनिष्ठ राहिलो आहे, मात्र पक्षातील काही निर्णय जिव्हारी लागल्याने उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे संजय पवार यांनी म्हटले आहे. उपनेते पदाचा राजीनामा दिला असला तरी, पक्षामध्येच मरेपर्यंत काम करणार आहे. पदाधिकारी निवड करताना पक्षाकडून विश्वासात घेतले गेले नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. राजीनामा नंतर पक्षाने कारवाई केल्यास जी असेल ती कारवाई स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देत गोंधळ निर्माण केला.
Post a Comment
0 Comments