(कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरातील घटना)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड व बेळगाव भागात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात मंगळवार दिनांक ३० जून रोजी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी कोसळली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सखूबाई यांचे कौलारूघर माती व विटांनी बांधलेले पारंपरिक स्वरूपाचे आहे. सततच्या पावसामुळे भिंतीला मोठी तडे गेले होते. त्याच वेळी घरातील भिंत अचानक कोसळली. दुर्घटनेच्या रात्री सखूबाई यांचा मुलगा एकटाच घरात झोपलेला होता,तर सखूबाई या शक्य त्या धोक्याच्या भीतीने शेजारी राहणाऱ्या नातलगांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्य (भात, नाचणी इत्यादी) पूर्णतः नष्ट झाले असून सारा संसार उघड्यावर फडल्याने आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फटका बसला आहे. एकट्या महिलेला हा धक्का सावरणे कठीण जात आहे. सखूबाई पन्हाळकर या विधवा असून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.
घटनेची माहिती घेवून ग्रामपंचायत व तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणाची तातडीने माहिती द्यावी.तसेच लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घालून प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.सखूबाई पन्हाळकर यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी व नवीन घर उभारणीसाठी अर्थसहाय्य करण्यात यावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली जातं आहे.
Post a Comment
0 Comments