Type Here to Get Search Results !

पंचगंगा नदीपात्रात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न.

 


कोल्हापूर/प्रतिनिधी : तावडे हॉटेल जवळील पंचगंगा नदीपात्रात गांधीनगर ब्रिजवरून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सर्व घटना,शुक्रवार दि. 11जुलै 25 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. स्नेहा स्वामी असे त्यांचे नाव असून त्या सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळतीय. 


आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान शुभम काटकर हे महामार्गावरून जात असताना स्नेहा स्वामी यांनी नदीत उडी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना  सुखरूप बाहेर काढले आहे. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये त्यांना  पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments