चंदगड/प्रतिनिधी : कुमार विद्यामंदिर सुरुते शाळेतील शिक्षक शशिकांत सुतार यांनी आज शाळेत एक आगळावेगळा असा उपक्रम राबविला.इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थी,विद्यार्थिनींना वेगवेगळ्या झाडांचे व भाजीपाल्याची बियाणे वाटप करण्यात आले.परसात किंवा शेतातील बांधावर भाजीपाल्याची बियाणे घालून वेगवेगळ्या भाज्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात या हेतूने या नवीन उपक्रमाचे आयोजन केले होते.शशिकांत सुतार हे शाळेत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे उपक्रम राबवत असतात.त्यांनी हा उपक्रम स्वतः स्वखर्चातून राबविला असून विद्यार्थ्यांना 'झाडे लावा,झाडे जगवा'असा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे उपमुख्यध्यापक शिवाजी रामणकट्टी, शिक्षक तानाजी नाईक, रेणुका सुतार, रमेश नाईक व महाराष्ट्र माझा 24 लाईव्ह न्यूजचे उपसंपादक भरमु शिंदे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक गायकवाड तसेच आरोग्य सेवक गुरव,आशा सुपरवाईजर रसिका पाटील आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments