Type Here to Get Search Results !

अनेक भारतीय प्रेरणादायी योगी पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या योगाचार्य डॉ.निशा ठक्कर.

मुंबई/प्रतिनिधी : मुंबई येथील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षका डॉ.निशा ठक्कर यांना योगाचार्य हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,ए.जी.एम.ए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट )डॉक्टर सेल आयुष विभागाकडून अतिशय प्रतिष्ठेचा असा 'योग रत्न पुरस्कार' सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे पार पडला.



या पुरस्काराला महाराष्ट्रातील योग शिक्षक, योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे,डॉ.नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,डॉ.सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,डॉ,बाबुराव कानडे अध्यक्ष-आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्रा.कुणाल महाजन,मनोहर कानडे व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.




'सर्वोत्कृष्ट २१ भारतीय प्रेरणादायी योगी' हा पुरस्कार-

१५ जून २०२५ रोजी दिल्ली च्या लाजपत भवन येथे अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, संस्थापक योगगुरु मंगेश त्रिवेदी यांनी आयोजित केलेल्या  दुसऱ्या योग महाकुंभ येथे देशभरातून २०० हून अधिक योग शिक्षकांनी भाग घेतला होता.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी अभिषेक वर्मा होते.विशेष पाहुण्यांमध्ये योगगुरू अमितदेव, वास्तुविशारद प्रदीप जैनी, लेफ्टनंट कर्नल अमर दीपसिंग,आचार्य पवन दत्तजी महाराज आणि ज्येष्ठ पत्रकार दीपक चौरसिया यांसारखे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.


डॉ.निशा ठक्कर यांना "सर्वोत्कृष्ट २१ भारतीय प्रेरणादायी योगी"चा पुरस्कार मिळाला.त्यांचबरोबर याप्रसंगी “टॉप 21 इंडियन इन्स्पायरिंग योगी”या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यातआले. टॉप 21 इंडियन इन्स्पायरिंग योगीमधून त्यांचा फोटो कॉफीटेबलबुकच्या कवर पेज साठी निवडला गेला.


अनेक पुरस्कारांच्या मानकरी-डॉ.निशा ठक्कर


डॉ.निशा ठक्कर यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.डॉ.निशा ठक्कर या उच्चशिक्षित असून योगामधून PHD तर मानसशास्त्रामधून M.SC, मास्टर ऑफ आर्ट्स मधून फिलॉसॉफी विथ योगा, मुंबई युनिव्हर्सिटी मधून डिप्लोमा अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन योगा, योग विद्यानिकेतन मधून डिप्लोमा इन योगिक थेरपी केले आहेत.त्यांना एकूण 25 वर्षाचा अनुभव असून त्यांना आयुष योगाचार्य पुरस्कार 2025, टॉप 21 इंडियन इन्स्पायरिंग योगी मधून त्यांचा फोटो कॉफी टेबल बुक ला निवडला होता.2024 मध्ये त्यांना TEDx मध्ये बोलवले आणि इंडियन योगा असोशिएसननी योग चिकित्सक आचार्य ही पदवी दिली.त्यानंतर त्याचवर्षी अखिल भारतीय योग शिक्षक संघाचा महर्षी पतंजली योगरत्न पुरस्कार मिळाला,महाराष्ट्र सरकारचा 2023 चा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार, प्रसिद्ध मुजिक डायरेक्टर आनंदजी भाई शहा यांच्याहस्ते नयनरत्न पुरस्कार, 2017 साली " ति " हा पुरस्कार अमृता फडणवीस यांच्याहस्ते मिळाला. त्याचबरोबर त्यांना विद्युलता पुरस्कार,लोकमत वर्तमानपत्र तर्फे सखी सन्मान पुरस्कार,विष्णुअण्णा पाटील योग रत्न पुरस्कार,नारी रत्न पुरस्कार, इत्यादी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.


 डॉ. निशा ठक्कर यांचे सामाजिक योगदान :-


डॉ. निशा ठक्कर या गेली 25 वर्षे निःस्वार्थीपणे अंध मुलांसाठी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. उदा.मसाज व एक्युप्रेशर थेरपी शिकलेल्या अंध विद्यार्थ्यांना काम मिळवून देणे,अंध गरोदर गरीब महिलांसाठी डोहाळे जेवणाचे कार्यक्रम करणे व त्यांना योगा शिकवणे,अंध विद्यार्थामध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी गिर्यारोहण,वृक्षारोपण,तायकवांडोचे शिबीरचे आयोजन करणे,वाद्यवृंदसाठी गट तयार करुन देणे,वसतिगृहासाठी व निधी जमा करणे अश्या अनेक कार्याने त्या परिचित असून योगासोबत जलदिपासने व दिपासन शिकवतात.या सर्व मुलांना योग अभ्यासातील शुद्धी क्रिया व बांबू वरील आसने शिकवून त्याची प्रात्यक्षिके दाखविले असून  सुमारे 200 प्रयोग मुंबई व मुंबई बाहेर केले आहेत.योग शिक्षण व उपचार क्षेत्रात डॉ. ठक्कर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.त्यांनी गेल्या अनेक वर्षात योगसाधना प्रशिक्षण आणि आरोग्य जनजागृतीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना योगाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले असून या अनेक सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.एकंदरीत,डॉ.निशा ठक्कर यांचे उत्कृष्ट कार्यामुळे त्या नवोदित योग प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments