Type Here to Get Search Results !

'शक्तिपीठ' समर्थनार्थ उद्या पदयात्रा.


गडहिंग्लज प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : बहुचर्चित असलेल्या 'शक्तिपीठ' महामार्गाच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या सोमवारी पदयात्रा आयोजित केले आहे.ही पदयात्रा आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10:30 वाजता संकेश्वर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपा पासून सुरु होऊन प्रांत कार्यालया पर्यंत जाईल. यावेळी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. 


मागील आठवड्यात या 'शक्तिपीठ' महामार्गाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.त्या मोर्च्याला प्रत्युत्तर म्हणून ही पदयात्रा आयोजित केले असून या पदयात्रेत पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, महिला, युवक- युवती, भाजपाचे कार्यकर्ते  यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments