कोल्हापूर प्रतिनिधी : प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोल्हापूरातील शाहू स्मारक भवन येथे समाजरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी पुण्यातील उत्कृष्ट व्यावसायिक,उद्योजक मारुती शिट्याळकर यांना त्यांच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
सामाजिक व उद्योग क्षेत्रात मारुती शिट्याळकर यांनी भरीव असे योगदान दिले आहे.गरजू लोकांना आर्थिक सहकार्य,वारकऱ्यांना मदत,विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य,बेरोजगारांना रोजगार तसेच महिलांना बचत गटातून उत्तेजन देणे असे महत्वपूर्ण कार्य केले आहे.तसेच ते सध्या चंदगड तालुका रहिवाशी संघाचे नियुक्त अध्यक्ष हा कार्यभार सांभाळत असून नेहमी आपल्या दानशूर वृतीने लोकांना सहकार्य करत असतात.एकंदरीत या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय गुरुवर्य उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला असून यावेळी मारुती शिट्याळकर यांच्या मातोश्री लक्ष्मी शिट्याळकर,पत्नी मनिषा शिट्याळकर,सासू मीनाक्षी जुटेकर,धोंडीबा शिट्याळकर,रमेश जाधव, पांडुरंग गावडे ,सिताराम गुरव, विशाल गावडे यांची उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments