Type Here to Get Search Results !

मेगा इंजिनियरिंग कडून मराठी विद्यामंदिर कळसगादे येथे विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप.


चंदगड/प्रतिनिधी : मेगा कंपनी अंतर्गत शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दळवी यांच्या माध्यमातून मराठी विद्यामंदिर कळसगादे शाळेत विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यामध्ये शाळेसाठी आवश्यक असणारे संगणक,कलर प्रिंटर ,7 टेबल,तबला,ढोलकी, ताशे ,ढोल यासारखे संगीत साहित्य त्याचबरोबर खेळाचे भरघोस साहित्य देण्यात आले.


या शैक्षणिक साहित्यामुळे शाळेच्या सांस्कृतिक आणि भौतिक गरजांची पूर्तता झाली असून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळेल.त्याचबरोबर विविध तंत्र शिक्षण मिळेल.खेळाच्या साहित्यातून मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होईल.या कार्यक्रमासाठी मेगा कंपनीचे HR सुबराव पाटील,महादेव पाटील,मनोज परीट,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष दळवी,शिक्षणतज्ञ श्रीकांत दळवी,सदस्य सुरेश दळवी,किरण दळवी,मुख्याध्यापक व इतर शिक्षक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अध्यापक उत्तम भारमल यांनी केले. त्याचबरोबर मनोगत मुख्याध्यापक श्री.मुदगुण,श्री.वासनिक,कविता मुदगुण,सुरेश दळवी उपस्थित होते.आभार शरद मेश्राम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments