Type Here to Get Search Results !

दौलत कारखान्याकडील २०१०-११ च्या थकीत एफआरपीबाबत उद्या तहसील कार्यालयात बैठक.

चंदगड/प्रतिनिधी : २०१०-११ या गळीत हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह तातडीने अदा करावी, या मागणीसंदर्भात सोमवारी (दि.21) दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, चंदगड येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती दौलत बचाव कृती समितीचे प्रमुख ऍड एन. एस. पाटील यांनी दिली.


त्या काळात दौलत सहकारी साखर कारखान्याकडून फक्त अर्धी एफआरपी देण्यात आली होती. उर्वरित रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यानंतर कारखान्याचे गाळप बंद पडले आणि पुढे अथर्व कंपनीकडे कारखान्याचा कार्यभार गेला. करारात स्पष्ट नमूद असूनही अथर्व कंपनीने मागील पाच-सहा वर्षांत उर्वरित एफआरपी दिलेली नाही.


या रखडलेल्या रकमेसह व्याजही शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीसाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर विभाग), अथर्व कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी तसेच दौलत बचाव कृती समितीचे कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या हक्काच्या रकमेचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा कृती समितीने व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments