चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यासाठी एक महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे. ७,४०५ कोटी रुपये खर्चाचा आणि १,२०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तालुक्यात उभारण्यात येणार असून त्यामुळे २,६०० नव्या रोजगाराच्या संधी तयार होणार असल्याची माहिती आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे.राज्य सरकारच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) धोरणाअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, ‘ऋत्विक कोल्हापूर पीएसपी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमार्फत ‘ऑफ-स्ट्रीम क्लोज-लूप’ पद्धतीने प्रकल्पाची रचना करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या प्रकल्पाचा सामंजस्य करार पार पडला. २० डिसेंबर २०२३ रोजी जाहीर झालेल्या PPP धोरणानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आहे. सौर ऊर्जा आणि पंप स्टोरेज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वीज निर्मिती आणि ग्रीड स्थिरतेस मदत होणार आहे.चंदगडसारख्या नैसर्गिक संपत्तीने समृद्ध पण रोजगार मर्यादित भागात या प्रकल्पामुळे मोठी आर्थिक आणि सामाजिक प्रगती घडेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
“चंदगडच्या तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा म्हणून मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या सामंजस्य कराराद्वारे त्या मागणीला यश आले"
आमदार शिवाजीराव पाटील
Post a Comment
0 Comments