चंदगड/प्रतिनिधी : बेळगाव-वेंगुर्ला रोडवर चालू असलेली अपघातांची मालिका पाहता प्रशासनाकडून कोणतेच ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे प्रशासनाला अपघातग्रस्तांचा आक्रोश कळावा यासाठी सोमवारी (दि. 21 जुलै 2025 रोजी) सकाळी 11 वाजता तुर्केवाडी फाटा येथे 'आक्रोश मोर्चा,रास्ता रोको'चे आयोजन करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त नागरिक, प्रवाशांनी या मार्गासाठी रस्त्यावर उतरून शासनाला जागे करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन प्रताप पाटील यांनी केले आहे.
बेळगांव वेंगुर्ला रस्ता व्हावा ही अनेक दिवसांची मागणी असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या मृतांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचावा यासाठी हा रास्ता रोको आयोजित केला आहे. यावेळी या रस्त्यावर अपघातात दगावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच आता तरी प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी हा मार्ग व्हावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार आहे. बेळगांव वेंगुर्ला हा राज्यमार्ग असून वाहतूक मोठी आहे.पर्यटकांची गर्दी, अवजड वाहतूक यामुळे रस्त्याची वारंवार दुरवस्था होते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.केवळ खड्डे भरून अपघात थांबणार नाहीत. हा रस्ता होणे गरजेचे आहे. तरी प्रशासनाने यात लक्ष घालून रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी यावेळी केली जाणार असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
Post a Comment
0 Comments