महत्त्वपूर्ण बैठक कार्वे येथे पार पडली
चंदगड/प्रतिनिधी : दि.4 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ यांच्यावतीने विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. याच पार्श्वभूमीवर 08 व 09 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित शाळांमध्ये शाळा बंद आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.
शिक्षकांनी आझाद मैदान, मुंबई येथे एकत्र येऊन आपले हक्क व मागण्या मांडण्यासाठी टप्पा आंदोलनाचे आयोजन केले. यासोबतच, आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रातील विविध तालुक्यांतील शिक्षकांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या.
चंदगड तालुक्यातून ठोस सहभाग
चंदगड तालुक्यातील समन्वय संघाचे सचिव स्वप्नील बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही शाळांना निवेदन देण्यात आले व त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभागाची हमी दिली.
महत्त्वपूर्ण बैठक कार्वे येथे पार-
म. फुले विद्यालय, कार्वे येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांचे प्रतिनिधी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments