चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गडहिंग्लज जवळ झालेल्या अपघातातील जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे (रा.गडहिंग्लज ) यांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. या कारवाईची नोंद गडहिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.तक्रारदाराने लाचलुचपतच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवली होती.याची चौकशी करण्याचे आदेश कोल्हापूर युनिटला देण्यात आले होते.दिलेल्या तक्रारीप्रमाणे 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी नीता कांबळे यांनी तक्रारदार यांच्या मुलाकडे केली होती.पण तडजोडीनंतर 40 हजारांची लाच स्वीकारताना कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,संदीप काशीद,सुधीर पाटील,संदीप पवार,कृष्णा पाटील,संगीता गावडे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.कांबळे यांच्याकडून 40 हजार रुपये व मोबाईल जप्त केला असून त्या राहत असलेल्या केडीसीसी कॉलनीतील घराची तपासणी करण्यात येत आहे. या घटनेने गडहिंग्लज येथे खळबळ उडाली आहे.
Post a Comment
0 Comments