याच आषाढी वारीच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावातील विठ्ठलभक्त वारकरी मंडळींची पंढरपूरमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी आमदारांनी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या भक्तिभावाचे व त्यागमय सेवाभावाचे मन:पूर्वक कौतुक केले."वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या नित्यनेमाने वारीतल्या सहभागामुळेच आपल्या संस्कृतीचं दर्शन पिढ्यान्-पिढ्यांना घडत आहे," असे गौरवोद्गार आमदार पाटील यांनी काढले.चंदगड तालुक्यातील इतर वारकरी दिंड्यांनाही सदिच्छा भेटी देत आपला सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ केला.
या भेटीदरम्यान बाळाराम कदम,सुरेश पाटील,शिवाजी गुरव,गावडू पाटील,नाना पाटील,शांताराम गुरव,परशुराम काकतकर,बबन गुरव,संतोष पाटील,लक्ष्मण पन्हाळकर,निंगाप्पा नाईकसह आदी वारकरी मंडळी उपस्थित होती.
Post a Comment
0 Comments