Type Here to Get Search Results !

सुरुते येथे घराची भिंत कोसळून लाखोचे नुकसान,सुदैवाने जीवितहानी टळली.


चंदगड प्रतिनिधी/भरमु शिंदे : कोल्हापूर पश्चिम भागात अती मुसळदार व खूप मोठ्या प्रमाणात पावसाची संतत धार दिसून येत आहे.पावसाच्या अती कहरीमुळे अनेकांना लाखोंच्या नुकसानीना तोंड द्यावे लागले आहे. शेतकरी वर्गाने पेरलेले भात पीक पूर्णपणे पाण्याखाली जाऊन कुजले असून मोठ्या नुकसानीचा फटका बसत आहे.


सततच्या पाऊसामुळे सुरुते येथील सुनील रामचंद्र पाटील या शेतकऱ्याची घरची भिंत अचानक कोसळून लाखोचे नुकसान झाले,सुदैवाने  कोणतीही जीवितहानी झाली नाही.या दरम्यान चंदगडचे तहसीलदार 'एकदिवस शेतकऱ्यांसाठी' या कार्यक्रमाला सुरुते येथे उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन झालेल्या प्रकारची पहाणी केली.व तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले.यावेळी कृषी सहाय्यक सूर्यवंशी,ग्रामपंचायत सरपंच मारुती पाटील,काही सदस्य,पोलीस पाटील मधुकर पाटील,तलाठी बुरुढ व ग्रामस्थ उपस्थित होते.सदर झालेल्या घटनेमुळे नुकसानग्रस्त कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी चर्चा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments