Type Here to Get Search Results !

चंदगड येथे गट सचिवांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न.


चंदगड/प्रतिनिधी : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान योजना अंतर्गत चंदगड येथे तालुक्यातील सहकारी संस्थांमधील गटसचिवासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार राजेश पाटील होते. यावेळी ते म्हणाले कि,गटसचिव हे सहकारी संस्थांचे आधारस्तंभ आहेत.त्यामुळे दोनी घटकांतील त्यांना दुवा मानले जाते.

        

या कार्यक्रमाला सहायक निबंधक सुरजकुमार यजरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोमजाळ, तानाजी गडकरी, अशोक गडकरी, वैद्यकीय अधीक्षक शिवराज कुपेकर, अजित गोसावी,विजय तुपे, राहील मुजावर, मंगेश पाटील, विलास नार्वेकर, मनोहर पाटील, गणपती बिरजे, उमेश तेली, तसेच शिबिरात तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांचे गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments