चंदगड प्रतिनिधी / रुपेश मऱ्यापगोळ : राज्य शासनाचा प्रस्तावित नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग गडहिंग्लज, आजरा, चंदगड या विधानसभा मतदारसंघातून जाऊ देणार नसून प्रसंगी रक्त सांडू पण लढा तीव्र करू अशा प्रकारची भावना शिवसेनेच्या ( उबाठा ) ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित सर्वांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरुद्ध दर्शविला. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार असून चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांनी हा शक्तिपीठ महामार्ग चंदगड मधून आल्यास पर्यटन, उद्योग, व रोजगाराला गती मिळेल अशी अशी माहिती त्यांनी रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आणि कुमार गायकवाड यांची भेट घेऊन दिली आहे. या गोष्टीला विरोध म्हणून आज ही बैठक घेण्यात आली.आमदार पाटील यांनी केलेली मागणी व्यवहार्य नसून हा त्यांचा प्रयत्न उधळून लावण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
या शक्तीपीठ महामार्गामुळे नद्यांचे प्रवाह खंडित होणार असून महापुरासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हा मार्ग जिथून गोव्यात जाणार आहे तो भाग 'इको सेन्सिटिव्ह झोन' मध्ये असून तेथे असलेल्या असलेल्या जंगलाची हानी होऊन पर्यावरणाची हानी होणार असून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चंदगड विधानसभा मतदारसंघातून हा महामार्ग होऊन न देण्याची भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, वसंत नाईक, श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई, जनता दलाच्या नेत्या स्वातीताई कोरी, बाळेश नाईक, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग चव्हाण, भाजपाचे संग्रामसिंह कुपेकर, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments