कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष रामहरी राऊत,जिल्हा समन्वयक सुनिल कानुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास उपक्रम राबविण्यात आला.आरोग्य शिबिर व फराळ वाटप करत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय व ईतर सेवा देण्यात आली.
या भेटीदरम्यान जाताना वारकऱ्यांना मोफत गोळया,औषध व फराळ,पाणी वाटप करण्यात आले.यावेळी उपशहर समन्वयक सुनिल नेसरीकर,उपशहर समन्वयक अक्षय टिपूगडे, ,विभाग समन्वयक ज्ञानेश गावडे , उपशहर समन्वयक अंजना भालकर , विभाग समन्वयक अर्चना जाधव ,अर्पिता जाधव, उपजिल्हा प्रमुख रणजित मंडलिक , उपशहर प्रमुख विश्वनाथ माळकर,युवासेना जिल्हा सन्वयक कुणाल शिंदे ,युवासेना शहर समन्वयक मंगेश चितारे,गणेश रांगणेकर,किरण आतिग्रे,मनिषा खोत यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.यामध्ये कोल्हापूर ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचे मोलाचे सहकार्य मिळाले.
Post a Comment
0 Comments