चंदगड/प्रतिनिधी : बिझनेस कोच श्रावण गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी विद्यामंदिर सातवणे या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना गुरव म्हणाले कि,'मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणसंस्था नव्हेत,तर त्या आपल्या भाषेची,संस्कृतीची,परंपरेची वाहक आहेत.आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या आहारी जात असून मराठी शाळांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेतल्यास या शाळा पुन्हा बहरतील.
मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळाल्यास संकल्पना स्पष्ट समजतात,आत्मभान निर्माण होतं आणि भाषेवर प्रेम जपलं जातं.मराठी शाळा वाचतील तरच मराठी भाषा आणि संस्कृतीची समृद्धी होईल.अभिजाततेच्या घोषणेसोबत कृतीही हवी, या शाळेतील माजी विद्यार्थी म्हणून हे माझे कर्तव्यच मी समजतो.प्रत्येक ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा सुधारणे गरजेचे आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने गावोगावी खारीचा वाटा का असेना उचलणे गरजेचे आहे असेही ते याप्रसंगी म्हणाले.यावेळी सुनील गाडे,शिवाजी गावडे,डेव्हलपमेंट कम्युनिटीचे सदस्य व शिक्षकवर्ग उपस्थित होता.
Post a Comment
0 Comments