चंदगड/प्रतिनिधी : इच्छाशक्ती तुमची,साथ आमची हे ब्रीदवाक्य घेऊन कार्य करणारी संवेदना फाऊंडेशन व कै.भूषण गुंजाळ सृतिदिनानिमित्य भूषण गुंजाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड तालूक्यातील आई -वडील दोन्हीही हयात नसलेल्या इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नित्योपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम व मोफत आरोग्य तपासणी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम बुधवार दि.९ रोजी सकाळी १० वाजता बीआरसी सभागृह चंदगड येथे सटूपा फडके यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी,सुमन सुभेदार,संवेदना टिम प्रमुख संजय हरेर,संवेदना फौंडेशनचे प्रवक्ता संजय भोसले,सचिव संतराम केसरकर,सुरेश देशमूख,युवराज तिप्पे,गोपाळ गडकरी,विनायक गिरी,अजित गणाचारी,श्रीकांत पाटील,अनिल बागीलगेकर,इंद्रजित होनगेकर,संजय साबळे,डॉ.पल्लवी निंबाळकर,डॉ देवराज सुतार उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका मार्फत करण्यात आले आहे .
Post a Comment
0 Comments