Type Here to Get Search Results !

सखूबाईना रोटरी क्लबकडून मदतीचा हात !

 


बेळगाव/प्रतिनिधी : कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांचे घर ३० जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.सुदैवाने जीवितहानी टळली,मात्र संपूर्ण संसार उध्वस्त झाला.या संकटाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. सखूबाईंच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी ६० पोती सिमेंट, साडी व ब्लॅंकेट,शाल देण्यात आले.यावेळी मदत वितरणावेळी क्लबचे अध्यक्ष शशिकांत नाईक, माजी अध्यक्ष मनोहर वाटवे, चंद्रकांत राजमाने, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर डी. बी. पाटील तसेच सीमाकवी रवींद्र पाटील, मल्लाप्पा गुरव, परशराम काकतकर, लक्ष्मण कांबळे उपस्थित होते.


यावेळी मनोहर वाटवे म्हणाले कि,“सखूबाईसारख्या गरजू महिलेला मदतीची अत्यंत गरज आहे. समाजाने माणुसकी जपत मदतीचा हात पुढे केला पाहिजे.”तर डी. बी. पाटील म्हणाले –“ही मदत म्हणजे केवळ सिमेंट नव्हे, तर उध्वस्त संसाराला उभं राहण्यासाठी दिलेला माणुसकीचा आधार आहे. समाजातील संकटग्रस्तांना साथ देणं हा आमचा सामाजिक धर्म आहे. रोटरी क्लब ही संस्था नसून समाजासाठी सतत कार्य करणारी संवेदनशील चळवळ आहे.” 


रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करत सखूबाई पन्हाळकर यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण जागवला आहे. आज त्यांचा संसार उघड्यावर असला तरी, माणुसकीच्या भक्कम भिंतीवर तो पुन्हा उभा राहणार याबाबत विश्वास निर्माण झाला आहे.समाजातील गरजू, अपंग, विद्यार्थी व दुर्बल घटकांसाठी रोटरी क्लबने उभारलेले असे उपक्रम नक्कीच प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत.

Post a Comment

0 Comments