चंदगड/प्रतिनिधी : सिद्धिविनायक मंडळाने आपल्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत रामपूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबवला. हा उपक्रम कृषी विभाग, बागीलगे रामपूर विद्यालय व सिद्धिविनायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने यशस्वीपणे पार पडला.स्मशानभूमीच्या चारही बाजूंनी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. विशेष म्हणजे, मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याने एका झाडाची जबाबदारी घेत त्या झाडाच्या संगोपनाचा संकल्प केला. ही जबाबदारी केवळ झाडे लावण्यापुरती मर्यादित नसून, ती जगवण्याचा व वाढवण्याचा संकल्प असल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी सहाय्यक एस. डी. मुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "गावात कृषी विभागाच्या विविध योजना उपलब्ध असून, त्या सिद्धिविनायक मंडळाच्या माध्यमातून राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल."सदर कार्यक्रमाच्या वेळी रामपूर बागिलगे विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील, प्रा. प्रकाश बोकडे, रामपूर विद्यालयातील विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, तसेच ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व सिद्धिविनायक मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व अनुशासित पद्धतीने पार पडला. ग्रामस्थांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून परिसर हरित ठेवण्यासाठी असे उपक्रम नियमित राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Post a Comment
0 Comments