Type Here to Get Search Results !

आजीबाई रुक्मिणी ठरल्या कुटूंबाला आदर्शवत!


(अखेर वृद्धापकाळाने रुक्मिणी कोलेकर यांची अचानक एक्सिट)

   

कोल्हापूर ब्युरो : काही माणसे ही खूप वेगळी असतात म्हणून ती वेगळा ठसा उमटवतात.असाच एक प्रत्यय चंदगड तालुक्यातील एका छोट्याश्या खेड्यामध्ये पहायला मिळाला.आजच्या युगात जनरेशन,सध्याची पिढी ही भिन्न स्वरूपात आपल्या पसंतीने आयुष्य घालवितात.तर कधी-कधी अशांना वेळेनुसार आपल्या संस्कृतीचाही विसर पडतो.पण अशी कित्येक उदाहरणे आहेत,कि आजही लोक जुन्या चालीरीती, संस्कृती, परंपरा, संस्कार जतन करत त्या दुसऱ्या पिढीला देत असतात. व यातूनच येणाऱ्या पिढीचा उद्धार घडत असतो.जुनी वडिलधारी माणसं ही आपल्या संपूर्ण कुटूंबाला स्वतःहून जास्त प्रेम करत येणाऱ्या पिढीला घडवत असताना त्या कशा आदर्श बनतात? याचाच एक भाग आपण आता पाहणार आहोत.




माडवळे येथील रुक्मिणी पुन्नापा कोलेकर,वय 82 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.शांत, संयमी व्यक्तिमत्व असलेल्या रुक्मिणी कोलेकर यांच्या मायरुपी ममतेला गाव पोरका झाला.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.


रुक्मिणी यांचा जन्म 1943 रोजी बेकींनकरे, बेळगाव या गावात चांगल्या सदन  कुटुंबातला.वयाच्या अठराव्या वर्षी  त्यांचे लग्न माडवळे येथील पुनाप्पा यांच्याशी झाले.पती पारंपारिक शेती व्यवसायात कष्ट केल्याशिवाय पोट भरणार नाही,अशीच परिस्थिती येथूनच खऱ्या अर्थाने आयुष्याचा संसार सुरू झाला.त्याकाळची परिस्थिती वेगळी होती.म्हणून रुक्मिणी आई व त्यांच्या पतीने काबाड कष्ट करून आपल्या संसाराचा पाया रोवला. डोंगर शेती जवळ असलेले घर नेहमी माणसांची वर्दळ घरात राहायची, शेताशिवाराकडे जाणाऱ्या बाया बापड्या आजीची भेट घ्यायच्या, चहापाणी व्हायचे गप्पागोष्टी रंगायच्या, आजीचा स्वभाव अगदी प्रेमळ, बाहेरून जाणाऱ्या वाटसरूला हाक मारून विचारपूस करणारी अशी आजी मनाला आनंद देणार होती.उत्तम प्रकारे शेती करत काजू बाग सांभाळण्यात त्यांचा हातखंडा होता. घरची कुटुंब प्रमुख म्हणून ती आदर्श होती. कष्टाला महत्व देत होती. नातेवाईक व सख्या सोयऱ्यात तिला मानाचे पान होते. घरात तिच्या शब्दाला कमालीचा आदर होता. आपल्या मुलाबाळांवर व नातवंडावर तिचे कमालीचे प्रेम होते.

       

रुक्मिणी आई यांना दोन मुली व एक मुलगा आपल्या मुलांनी शाळा शिकून मोठे व्हावे असं त्यांचं स्वप्न होतं. पण ते स्वप्न पूर्ण झालं नाही.परिस्थितीमुळे मुलांना शिकता आलं नाही.याचं दुःख त्यांना कायमस्वरूपी राहील. पुढे मोठी मुलगी शशिकला हिचा सावर्डे गावात सत्तूराम पाटील अशा सदन कुटुंबात विवाह लावून देण्यात आला. दोन नंबरची मुलगी जनाताई यांचा विवाह शिनोळी येथील संभाजी बिर्जे यांच्याशी झाला.तर मुलगा रवळू यांचाही विवाह झाला .मुलगा आपल्या शेती व्यवसायात काम करत आई-वडिलांची सेवा करत शेत-शिवारात राहून गेला. वारकरी सांप्रदाय भाविक भक्तात भजन कीर्तनात रंगून गेले आहेत.सुन लता यांनीही कुटुंबाला आधार दिला. आपल्या मुलांना परिस्थितीमुळे शिकवता आले नाही. पण आपल्या नातवंडानीं शिकून मोठे व्हावे, अशी भावना रुक्मिणी आई  यांनी कायम ठेवली. नातवंडानेही आपल्या आजीचा  शब्द खरा ठरवला.सुनील पाटील हा नातू शिनोळी येथील ॲटलास कंपनीत तर सुरज पाटील हा भारतीय सैन्यात रुजू झाला.सतीश पाटील वैजनाथ वाशिंग सेंटर गॅरेज स्वतः घातलं आहे.त्याचप्रमाणे संदीप बिर्जे, कापड दुकान पाटणेफाटा येथे आहे. सरिता बिर्जे यांचा विवाह यशवंत व्हणोळी यांच्याशी झाला आहे.तर अजय कोलेकर DME कंपनी शिनोळी येथे कामाला आहे. मधुरा पाटील यांनी   नात्यात लग्न लावून आपलेपणा ठेवला आहे.

   

खऱ्या अर्थाने  नातवंडांवर आजीच्या संस्कारांची शिदोरी होती.नात सुवर्णा कुंदेकर यांचा विवाह नांदवडे येथील सैन्यात असलेले विजय कुंदेकर त्यांच्याशी झाला.पणतु  गायत्री, श्रेयश, पियुष,सिद्धी,समर्थ, शिवन्या,सानवी, ओम, नातसुना सुहानी, मधुरा,समृद्धी,पूनम यांच्यात आजी रमून गेल्या होत्या.आयुष्याच्या संध्याकाळी उत्तम प्रकारे आयुष्यात आनंदी जीवन जगत होत्या. मध्यंतरीच्या काळात पतीचे निधन झाल्यानंतर त्या थोड्या खचल्या होत्या. रोजच्या प्रमाणे त्यांनी 4 जुलै  2025 रोजी संध्याकाळी आहार घेतला. आणि त्या झोपी गेल्या. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.कोणताही आजार नसताना अचानक मृत्यू सर्वांच्या जिव्हारी लागला.त्यांना 82 वर्षाचे निरोगी आयुष्य लाभले. अशा प्रेमरूपी आजीच्या मायेला सर्वजण पोरकी झाली.आमच्या आजीच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 

शब्दाकंन :- 

सुनील सतुराम पाटील (खालसा सावर्डे )

Post a Comment

0 Comments