Type Here to Get Search Results !

समाजसेवक लक्ष्मण सावंत यांना गुरुवर्य समाजरत्न पुरस्कार प्रदान.


कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोल्हापूरातील शाहू स्मारक भवन येथे समाजरत्न पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी चंदगड तालुका रहिवासी संघ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पुंडलिक सावंत यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना गुरुवर्य समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.




समाजसेवक पुंडलिक सावंत यांनी सामाजिक क्षेत्रातून भरीव असे योगदान दिले आहे.गरजू लोकांना आर्थिक सहकार्य, वारकऱ्यांना मदत, मंडळाना सहकार्य,युवा कलाकारांना चालना देणे तसेच महिलांना रोजगार मिळून देणे असे भरीव योगदान दिले असून या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय गुरुवर्य समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला असून सावंत यांच्या पत्नी व मित्रपरिवार यांनी हजेरी लावली होती.

Post a Comment

0 Comments