चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील २०२५-२०३० या पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज (सोमवार दि. २१ जुलै रोजी) जाहीर झाले.चंदगड तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीत तहसीलदार राजेश चव्हाण यांनी ही आरक्षण सोडत काढली.सुरुवातीला तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आरक्षण सोडत प्रक्रियेची माहिती दिली.यावेळी प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार शशिकांत किल्लेदार, मंडळ अधिकारी देविदास तारडे, तुकाराम नाईक, महसूल सहाय्यक अमर साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पाटील, इक्बाल तांबुळी, गणेश रहाटे, शुभम मुडें, गजानन धर्माधिकारी, माजी आमदार राजेश पाटील, बबन देसाई, अभय देसाई, धोंडीबा नाईक, विष्णू गावडे आदी उपस्थित होते.यावेळी दयानंद पाटील या शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्या काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
चंदगड तालुक्यात १०९ ग्रामपंचायती असून अनुसूचित जातीचे सर्वसाधारण ६ तर ५ स्त्रिया, अनुसुचित जमातीसाठी १ स्त्री, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारण १५ तर १४ स्त्रिया, सर्वसाधारण गटात सर्वसाधारण ३४ व ३४ स्त्रिया असे तालुक्याचे आरक्षण निश्चित झाले आहे. सोमवारी सोडत पध्दतीने प्रत्यक्ष सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
यासंदर्भात गावनिहाय आरक्षण खालील प्रमाणे असणार आहे.
अनुसूचित जाती :
१) किटवाड २) खा. कोळींद्रे,खा. सावर्डे,शिप्पुर ३)ढोलगरवाडी ४) बुझवडे ५) वाघोत्रे ६) सडेगुडवळे
अनुसूचित जाती महिला :
१) इब्राहीमपुर २) कडलगे खु. ३) जांबरे ४) तेऊरवाडी ५) निट्टर
अनुसूचित जमाती महिला :
१) मिरवेल
ना. मा. प्रवर्ग (ओबीसी) :
१) कागणी, हंदळेवादी २) कामेवाडी ३) कालकुंद्री ४) कुदनुर ५) कोलीक ६) कोवाड ७) जंगमहट्टी ८) तांबुळवाडी ९)नांदवडे,शेवाळे १०) नागरदळे ११) बोंजुर्डी, मोरेवाडी १२) मलतवाडी १३) मांडेदुर्ग १४) माडवळे १५) मौजे कार्वे
ना. मा. प्रवर्ग महिला (ओबीसी) :
१) कुरणी,धामापुर २) कोकरे,आडुरे ३) कौलगे ४) तडशिनहाळ,सुपे ५) दाटे, बेळेभाट, नरेवाडी,वरगांव ६) पार्ले ७) बसर्गे,गौळवाडी ८) भोगोली ९) शिरोली, सत्तेवाडी १०) सातवणे ११) सुंडी १२) सुरुते १३) हाजगोळी १४) हिंडगांव, फाटकवाडी
सर्वसाधारण :
१) अलबादेवी २) आसगोळी ३) उमगांव,न्हावेली ४)करंजगांव ५) करेकुंडी ६) कलिवडे, किटवडे ७) कानडी, पोवाचीवाडी ८) केंचेवाडी ९)कोदाळी, गुळंब १०) कोनेवाडी ११) खा. म्हाळुंगे १२) गणुचीवाडी १३) गवसे १४) गुडेवाडी १५) जट्टेवाडी १६) तावरेवाडी १७) तुर्केवाडी, वैतागवाडी १८)दिंडलकोप,तळगुळी १९) देवरवाडी २०) नागणवाडी २१) नागवे २२) पुंद्रा,कानुर बु,बिजूर २३) बक्कीहाळ २४) मजरे कार्वे २५) महिपालगड २६) माणगाव, मलगड २७) मोटनवाडी २८) राजगोळी खुर्द २९) राजगोळी बु., यर्तनहट्टी ३०) रामपूर ३१) लकीकट्टे ३२) लाकुरवाडी ३३) सरोळी ३४) हेरे
सर्वसाधारण महिला :
१) अडकुर,मलगेवाडी २) आंबेवाडी ३) आमरोळी, पोरवाडी ४)आसगाव, हंबीरे,चुरणीचावाडा,सुळये ५) इसापुर ६)उत्साळी ७) कडलगे बु. ८) कळसगादे ९) काजिणे, इनाम म्हाळुंगे १०) कानुर खु,पिळणी ११) किणी १२)केरवडे,वाळकुळी १३) कोरज, कुर्तनवाडी,गंधर्वगड १४) खा. गुडवडे, खामदळे १५) घुल्लेवाडी, जक्कनहट्टी १६) चिंचणे १७) जेलुगडे १८) ढेकोळी, ढेकोळीवाडी १९) तुडीये, मळवीवाडी २०) दंडगे २१) घुमडेवाडी २२) पाटणे २३) बागीलगे २४) मुगळी,सोनारवाडी २५) मुरूकटेवाडी २६) मौजे शिरगाव, मजरे शिरगाव,इनाम सावर्डे २७) म्हाळेवाडी २८) विंझणे २९) शिनोळी खु. ३०) शिनोळी बु. ३१) शिवणगे ३२) हलकर्णी ३३) हल्लारवाडी ३४) होसुर
Post a Comment
0 Comments