कोल्हापूर/प्रतिनिधी : हॉटेल कामगार संघटना कोल्हापूर यांच्यावतीने आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली.
पर्यटनाच्या दृष्टीतून महत्त्वाचा दुवा असलेला हा हॉटेल कामगार ज्याच्या हातून येणाऱ्या पर्यटकांची, लोकांची जेवणाची, राहण्याची, फिरण्याची सोय केली जाते. अश्या हॉटेल कामगारांना सोयीसुविधे पासून वंचित ठेवण्याचे काम केले जाते. त्यामुळे हॉटेल कामगार कल्याणकारी महामंडळाचे अंमलबजावणी होऊन सुद्धा आजपर्यंत त्याचा शासन निर्णय म्हणजे जीआर न मिळाल्यामुळे हॉटेल कामगार यांच्यामध्ये नाराजी आहे. त्यामुळे लवकरात लवकर या महामंडळाचा जी आर काढून स्थापना व्हावी व हॉटेल कामगारांना न्याय मिळावा.अशी मागणी करत याविषयीचे निवेदन देण्यात आले.
आपण शासन दरबारी हॉटेल कामगारांची बाजू मांडून मंजूर करून घेतलेल्या हॉटेल कामगार कल्याणकारी महामंडळाबद्दल आम्ही हॉटेल कामगार आपले ऋणी असून लवकरच त्याची अंमलबजावणी वकरण्यात यावी असे हॉटेल कामगार संघटनेचे संस्थापक अनिल कांबळे यांनी मंत्री आबिटकर यांचे आभार मानत आपले मत व्यक्त केले.यावेळी कृष्णा जाधव,आकाश गावडे,दीपक पाटील,रवींद्र जाधव,महादेव कांबळे,ज्ञानेश्वर कांबळे,समर्थ क्षीरसागर,रामचंद्र पाटील,रवींद्र पाटील,अभिषेक नायर,दिलीप गावडे,सोमनाथ शिरगावकरसह आदी हॉटेल कामगार पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments