नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : नेसरी येथील भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालयामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले.माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड हेमंत कोलेकर यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी वैभव लक्ष्मी बल्ड बँक महागाव यांनी ३५ बॅगा रक्त संकलन केले. चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्याहस्ते रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन सत्कार झाला.यावेळी कृष्णराव वाईंगडे, सरपंच धोंडीबा कुंभार, ज्योती खराडे, सरिता लांडे, सरिता धुमाळे, डाॅ. अर्चना कोलेकर, दत्तात्रय पाटील, राजेंद्र कांबळे, युवराज पाटील, राजू दावणे, एम. आर. पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, माजी सरपंच आशिषकुमार साखरे, मारूती पाटील, सुरेश कुराडे, संतोष नाईक, मेजर वसंत देसाई, राजेंद्र नाईक, पांडुरंग पाटील, शुभम सलामवाडे, प्रविण पाटील, ईश्वर नाईक, शिवाजी पाटील, सागर नांदवडेकर, दशरथ सावंत, बाळकृष्ण मणगुतकर, रणजित नाईक, संभाजी मणगुतकर, शाहू जाधव, शंकर नाईक आदी उपस्थित होते.भाजपा मंडळ अध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments