चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने रक्षाबंधनचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरातील वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण व त्याची जबाबदारी अधोरेखित झाली.त्यानिमित्ताने चंदगड पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन तेथील पोलीस बांधव व कर्मचाऱ्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला.
चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यामार्फत चालणाऱ्या विविध विभागांची व कामकाजाची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना कोणत्याही गोष्टीला बळी न पडता निर्भयपणे वाटचाल करावी असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गावडे यांनी करून रक्षाबंधन सणाचे महत्त्व विशद केले.
यावेळी डॉ. एन के पाटील म्हणाले की,9 ऑगस्ट या दिवशी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली.आणि ब्रिटिश सत्तेला पहिला हादरा बसला असे सांगून त्यांनी क्रांती दिनाचे महत्त्व विशद करून स्वातंत्रपूर्व काळातील विविध ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला.सूत्रसंचालन प्रा.व्ही.के गावडे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार डॉ.एस. एन पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोनापा गोरल,प्रा.एल एन.गायकवाड,डॉ. एस एस. सावंत,डॉ.जी. वाय. कांबळे, डॉ. अरुण जाधव, प्रा. रा सु. गडकरी, मुन्ना पिरजादे यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments