Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उबाठा शिवसेनेकडून उद्या कर्जमुक्ती दिंडी शुभारंभ.

 


चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी व शेतकऱ्यांच्या हिताला बाधा असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 10 ऑगस्ट 25 रोजी चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून सकाळी 9.00 वा. शेतकरी कर्जमुक्ती दिंडी शुभारंभ होणार आहे.या शुभारंभाच्या कार्यक्रमास शिवसेना नेते खासदार विनायक राऊत,आमदार सुनील प्रभू ,संपर्क नेते अरुणभाई बुधवडकर ,उपनेते संपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील तसेच तालुक्यातील संपर्क प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. 

   

शेतकरी कर्जमुक्ती दिंडी दि. 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत निघणार आहे.या दिंडीची सुरुवात चंदगड इथून आजरा,गडहिंग्लज मार्गे निघून याची सांगता कोल्हापूर येथील नृसिंहवाडी येथे होणार आहे. या दिंडीद्वारे शेतकऱ्यांच्या खालील मागण्या मांडण्यात येणार आहेत.

1) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या व 7/12 कोरा करा. 

 2) शक्तिपीठ महामार्ग रद्द करा. 

3) नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50,000 अनुदान द्या.

Post a Comment

0 Comments