Type Here to Get Search Results !

थकीत एफआरपी बिनव्याजी तात्काळ मिळावी- शेतकरी बांधव



चंदगड/प्रतिनिधी : अथर्व दौलत शेतकरी सहकरी साखर कारखान्याकडून थकीत बिनव्याजी मूळ एफआरपी लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मांडेदुर्ग येथील शेतकऱ्यांनी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


सदर निवेदनात असे म्हंटले आहे की, काही स्वार्थी लोकांकडून अर्थव आणि शेतकऱ्यांच्यामध्ये दरी निर्माण करण्यासाठी नियोजनबध्द खेळी खेळली जात आहे. अशा कमीटीला आपण वेळोवेळी चर्चेला बोलावून प्रशासन शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे.ही कमिटी शेतकऱ्यांची हित न पाहणारी व बेकायदेशीर असल्याने या कमीटीला बोलावून आपण ताकीद ‌द्यावी अन्यथा याविरोधात आंदोलन उभा करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या निवेदणा‌द्वारे अर्थव कंपनीकडून बिनव्याजी आम्हांला आमच्या हक्काची मुळ एफआरपी लवकरात लवकर मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने मांडेदुर्ग भागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments