(पाटणे फाटा येथील धरणे आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा)
चंदगड प्रतिनिधी/ रुपेश मऱ्यापगोळ : मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. 29 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचा ताफा मुंबई या ठिकाणी दाखल झाला.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज चंदगड तालुका यांच्यावतीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सामाजिक, राजकीय, शिक्षण, कृषी, औद्योगिक, उद्योग-व्यवसाय इत्यादी विविध क्षेत्रातील मंडळी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. या धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक नितीन पाटील यांनी केले.यावेळी प्रा.दिपक पाटील,प्रा.सुनील शिंत्रे,प्रभाकर खांडेकर,शंकर मनवाडकर,एम. जे. पाटील,दिलीप माने,एकनाथ कांबळे ,रजत हुलजी,विष्णू गावडे,महादेव बाणेकर,प्रशांत अनगुडे,भरमू नांगनूरकर,जानबा चौगुले,वसंत जोशीलकर,पांडुरंग जाधव,रणजीत भातकांडे,नवनीत पाटील,पांडुरंग बेनके आदी मान्यवरांची भाषणे झाली.
सकल मराठा समाजाच्या वतीने प्राध्यापक मा. दीपक पाटील यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाचे विविध टप्पे सांगुन सुरू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. 'यापुढे हे आंदोलन प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर पोहोचवण्याचे काम महत्त्वाचे असुन आंदोलनाला यश मिळेपर्यंत आंदोलनाची धग कमी होऊ देऊ नका तसेच विद्यार्थी, कॉलेज युवक इत्यादी सर्व घटकांपर्यंत हे आंदोलन पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर शंकर मनवाडकर यांनी सर्वांनी राजकीय गट-तट व पक्ष बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजी माजी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.यावेळी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के पाटील यांनी केले तर आभार जयवंत पाटील यांनी मानले.
Post a Comment
0 Comments