(लोकशाहीच्या बळकटीसाठी युवकांचा सहभाग गरजेचा-दिनकर पाटील)
नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : पुरोगामी विचार जोपासत लोकशाहीच्या बळकटी करणासाठी युवकांचा सहभाग गरजेचा आहे असे प्रतिपादन श्री. लिंगदेव दुध संस्था तारेवाडीचे उपाध्यक्ष तथा पत्रकार दिनकर पाटील यांनी केले.ते नेसरी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शेकापचे गडहिंग्लज तालुका चिटणीस वसंतराव कांबळे अध्यक्षस्थानी होते.समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते विश्वास देसाई यांच्याहस्ते झाले.दिनकर पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.
शेकापचे गडहिंग्लज तालुका चिटणीस वसंत कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविकात पक्षाची ध्येय धोरणे विशद करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.दिनकर पाटील म्हणाले, तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता युवकांच्या माध्यमातून पुरोगामी विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले तरच समाज परिवर्तन जोमाने होईल.यावेळी शेकाप चंदगड तालुका चिटणीस चंद्रकांत बागडी, मधुकर नांदवडेकर, संजय कांबळे, व्हळ्याप्पा कांबळे, शिवाजी कांबळे, अतुल कांबळे, मारूती कांबळे, शैलेश कांबळे, सतीश कांबळे यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.विजय कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.सहचिटणीस लक्ष्मण नाईक यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments