Type Here to Get Search Results !

बापूसाहेब शिरगांवकर यांची भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड.


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील सामाजिक कार्यात प्रचलित असणारे बापूसाहेब शिरगावकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत राष्ट्रीय सदस्य प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या सुचनेनुसार जिल्हा अध्यक्ष गणेश पोवार यांच्याद्वारे त्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या चंदगड तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.


यावेळी अँटी करप्शनचे जिल्हाध्यक्ष धीरज रोकडे,हातकणंगले तालुका अध्यक्ष इमरान मोमीन उपस्थित होते.यावेळी "मला मिळालेल्या संधीतुन लोकांचे विषय मार्गी लावत या पदाला न्याय देऊ अशी प्रतिक्रिया बापूसाहेब शिरगावकर यांनी दिले.

Post a Comment

0 Comments