Type Here to Get Search Results !

ऍड.संतोष मळवीकर यांच्यावरील तडीपारची कारवाई मागे घ्या-नागरिकांची मागणी

 


चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : ऍड. संतोष मळवीकर यांनी कित्येक आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी स्वतःसाठी कसलाही विचार न करता समाजासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतलेल्या आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एकही गुन्हा नोंद नाही, त्यांच्या आंदोलनातून शासकीय मालमत्तेचे कधीही नुकसान झालेले नाही कोणत्याही सामाजिक व्यक्तीला त्रास दिला नाही तसेच त्यांच्यावर खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल नसून जे गुन्हे दाखल आहेत ते समाजातील लोकांच्यासाठी झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे आहेत. त्यामुळे एकंदरीत, सर्व बाबींचा विचार करून ही केलेली कारवाई लोकशाहीला घातक असून तात्काळ त्यांच्यावर करण्यात आलेली तडीपारची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी चंदगड तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.



यावेळी संभाजी मळवीकर, विठोबा कुट्रे, दयानंद गावडे, प्रकाश पाटील, नागोजी शिंदे, धाकलू गावडे, शंकर गावडे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments