(जिल्हास्तरीय काव्यगायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शिनोळी खुर्द येथे संपन्न)
चंदगड (प्रतिनिधी): “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. काव्यगायनातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता फुलून येते आणि आत्मविश्वास वाढतो. चंदगड मराठी अध्यापक संघाने अशा उपक्रमांतून संपूर्ण राज्यात एक नवा पायंडा पाडला आहे,” असे उद्गार माजी शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी व्यक्त केले.चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय काव्यगायन स्पर्धा 2025 चा पारितोषिक वितरण सोहळा शिनोळी खुर्द येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थान तालुका संघाचे मॅनेजर एस. वाय. पाटील यांनी भूषवले. प्रास्ताविकात एम. एन. शिवणगेकर यांनी अध्यापक संघाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. तर अध्यक्ष मोहन पाटील आणि मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते :
कु. हर्षिता संग्राम निकम (मुदाळ, भुदरगड) – “अनामवीरा” ही काव्यरचना गाऊन सर्वांची मने जिंकली.
कु. देवयानी तानाजी पाटील (शिनोळी बु., चंदगड) – “धरलेल्या पंढरीचा चोर” या अभंगाने प्रेक्षक दंग केले.
कु. कीर्ती सदाशिव अवदी (कोल्हापूर)
कु. जान्हवी निवास पाटील (कोल्हापूर)
कु. पूर्वा श्रीकांत वाघे (हेरवाड, शिरोळ)
उत्तेजनार्थ : स्वराली जोंगे (शाहूवाडी), श्रेणिक सुतार (कोल्हापूर), सिद्धीका मुल्लानी (पट्टणकोडीली), आराध्या मोरे (कोल्हापूर).
तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते :
कु. शैलेजा कल्लाप्पा पाटील (राजगोळी)
कु. समिधा सुनील खोचरे (चंदगड)
कु. प्रज्ञा परशुराम सुतार (नागनवाडी)
कु. राजकुमार मनोहर सोनार (तुर्केवाडी)
कु. प्रियंका मोहन नांदवडेकर (आमरोळी)
उत्तेजनार्थ : स्वराज सदाशिव पाटील (कार्वे), चैत्राली विठ्ठल पाटील (शिनोळी खुर्द).
विजेत्यांना आकर्षक गौरवचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सोलापूर मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र आसबे, जिल्हा संपर्कप्रमुख समाधान घाडगे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव बी. डी. तुडयेकर, गुलाब पाटील, व्ही. के. फगरे, एन. टी. भाटे, व्ही. एल. सुतार, एस. पी. पाटील, प्रा. मासाळ आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन राघवेंद्र इनामदार यांनी केले.हा काव्यगुणांचा सोहळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांना नवी प्रेरणा व सर्जनशीलतेचा नवा किरण देणारा ठरला.
Post a Comment
0 Comments