Type Here to Get Search Results !

गोवा बनावटीच्या मद्यासह 1 कोटी 77 लाखाचा मुद्देमाल जप्त.


(राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई)


कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेशोत्सवच्या मुहूर्तावर राज्य उत्पादन शुल्क विभाग,कोल्हापूर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या भरारी पथकाने कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावर काल (सोमवारी) रात्री पडवळवाडी येथे कारवाई केली आहे.या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्याचे 1400 बॉक्स आणि वाहतुकीसाठी 'वापरण्यात आलेला एक आयशर टेम्पो असा सुमारे 1 कोटी 77 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यावेळी शैलेश जाधव आणि वासुदेव मुंढे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments