चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : बेळगावसह सीमाभागात सुरु असलेल्या कन्नडसक्तीसंदर्भातील परिस्थितीची संपूर्ण माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतली.दि. 9 ऑगस्ट 25 रोजी ठाणे मुक्कामी आनंदवन आश्रमात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत व सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर कन्नड सक्ती संदर्भात सविस्तर माहिती दिली.
बेळगावात कर्नाटक प्रशासनाकडून मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपीबाबत कल्पना दिली असता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तात्काळ तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली.चर्चेअंती खासदार धैर्यशील माने यांनी समाज माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलेल्या पत्राविषयीही आपटेकर यांच्याशी चर्चा केली.
Post a Comment
0 Comments